पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांची अनेक प्रकारे पिळवणूक

Satara
Satara
Updated on

सांगवी (जि. सातारा) : फलटण तालुक्‍यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे फॉर्म भरून देण्यापासून योजनेचे पैसे बॅंक खात्यावर जमा होईपर्यंत शेतकऱ्यांची अनेक प्रकारे पिळवणूक होत आहे. या प्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयांत डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे फॉर्म जमा करावे लागतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी फॉर्म दाखल करूनही अनेक शेतकऱ्यांचे फॉर्म अद्याप भरण्यात आलेले नाहीत. त्यामधील चुकांची दुरुस्तीही अद्याप केली गेली नाही. काही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा न होता दुसऱ्याच्या बॅंक खात्यात जमा झालेले आहेत. डाटा एंट्री ऑपरेटरच्या चुकांमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. गाव कामगार तलाठी वर्ग हे आपला त्रास कमी करण्यासाठी ऑपरेटरकडून कामे करून घेत आहेत. त्यात ऑपरेटर मनमानी करू लागले आहेत.

शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून घेण्यासाठी प्रती फॉर्म 200 ते 300 रुपये डाटा ऑपरेटरला द्यावे लागतात. पैसे देऊनही वेळेत अचूक फॉर्म भरला जात नाही. डाटा एंट्री ऑपरेटरने केलेल्या चुकीचा शेतकऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. बॅंक खाते दुरुस्त करण्यासाठी दररोज शेतकरी डाटा एंट्री ऑपरेटरकडे खेटे घालताना दिसून येत आहेत. त्यात हे ऑपरेटर उपकाराची भाषा वापरत असल्याची शेतकरी तक्रार करीत आहेत. 

फलटण तहसील कार्यालयाशिवाय काही महा- ई सेवा केंद्रांमध्ये तहसील कार्यालयाचा आयडी पासवर्ड देऊन संगणमताने पैसे घेऊन किसान सन्मान निधीचे फॉर्म भरून दिले जात असून, ही बाब गंभीर आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. डाटा एंट्री ऑपरेटरचा संगणमताने सुरू असलेला गैरप्रकार बंद करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

""फलटण तालुक्‍यातील कित्येक शेतकऱ्यांना हे ऑपरेटर फॉर्म भरण्यासाठी पैशाची मागणी करत आहेत. जेवढी रक्कम जास्त तेवढे फॉर्म लवकर भरले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.'' 

- धनंजय महामूलकर, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Aditya Lalage selected for India Hockey World Cup squad
Kas Lake overflow tourist safety Satara
Nitin Gadkari Acknowledges Highway Issues; Commuters Seek Accountability
Historic Botanical Discovery: Endemic Orchid Found for the First Time in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com