सार्वजनिक गणेशोत्सवाला या नऊ गावांत फाटा

karad
karad
Updated on

वहागाव : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवात उपाययोजना केल्या जात आहेत. अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबवले जावेत, यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. तळबीड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नऊ गावांत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा, तर तीन गावांत "एक गाव, एक गणपती' बसविण्याचा निर्धार गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तीने केला आहे. 

प्रशासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी तळबीड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील या कार्यक्षेत्रातील गावांत गणेश मंडळांचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन जनजागृती करताना दिसत आहेत. तळबीड पोलिस ठाण्याला 12 गावांचे कार्यक्षेत्र आहे. आतापर्यंत गावनिहाय झालेल्या बैठकीत तासवडे, वराडे, वहागाव, वनवासमाची, वडोली भिकेश्वर, तळबीड या गावांतील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिरवडे, नडशी, बेलवडे हवेली या तीन गावांतील मंडळांनी गावच्या ग्रामदैवत मंदिरात गणेशमूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. घोणशी, यशवंतनगर व धनकवडी गावांत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही "एक गाव, एक गणपती' बसविण्याचा निर्धार गणेश मंडळांनी केला आहे. पोलिस प्रशासनाकडून गणेश मंडळांच्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. 


तळबीड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा तसेच "एक गाव, एक गणपती' बसविण्याचा निर्णय अनेक गणेश मंडळांनी घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचा निर्णय कौतुकास्पद आहे. 

- जयश्री पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, तळबीड 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com