esakal
पुसेगाव (सातारा) : श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गुरुवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव (Pusegaon Rath Yatra) झाला. त्यात भाविकांनी एका दिवसात ८७ लाख ४० हजार रुपयांची देणगी रथावर अर्पण केल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने यांनी दिली.