राजवडी धबधबा बुलाता है, पर जाने का नही..!

Satara
Satara
Updated on

बिजवडी (जि. सातारा) : गेल्या वर्षापासून पर्यटनस्थळ म्हणून चर्चेत आलेला राजवडी (ता. माण) येथील धबधबा याही वर्षी पर्यटकांना खुणावतोय. मात्र, हा धबधबा ज्या ठिकाणाहून वाहतोय, त्या ठिकाणची दरड कोसळल्याने तो धबधबा धोकादायक बनला आहे. त्यात जीवघेण्या कोरोनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पर्यटकांनी मोह आवरण्याबरोबर कोसळणाऱ्या दरडीपासून सावध राहणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यटकांना यावर्षी राजवडी धबधबा बुलाता है, पर जाने का नही..! अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

माण तालुक्‍यात झालेली जलक्रांती, त्यात निसर्गाच्या कृपेमुळे तालुक्‍यात पर्यटनस्थळे तयार होऊ लागली आहेत. असेच पर्यटनस्थळ गेल्या वर्षापासून राजवडी येथे तयार झाले आहे. हा धबधबा पाहिल्यानंतर सर्वांना ठोसेघरच्या धबधब्याची आठवण होते. परंतु, तो धबधबा फक्त दुरून पाहता येतो. त्यात भिजण्याचा आनंद घेता येत नाही. मात्र, राजवडी धबधब्यावरून पडणाऱ्या पाण्याखाली भिजण्याचा मनसोक्त आनंद घेता येतो. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटकही या धबधब्याकडे आकर्षित झाले आहेत. 

गेल्यावर्षी सरपंच डॉ. मिलिंद कुंभार यांनी पर्यटकांसाठी सूचना तसेच येणे-जाणे सोयीचे व्हावे यासाठी ठिकठिकाणी फलक लावले होते. निसर्गरम्य वातावरण, सगळीकडे हिरवागार परिसर त्यात हा धबधबा सर्वांनाच आकर्षित करतो. गेल्या वर्षी तर महाबळेश्वर, पाचगणी, ठोसेघर, कासबरोबर पर्यटक राजवडी धबधबा पाहायला आवर्जून येत होते. यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाने धुमाकूळ घातला. तालुक्‍यावर निसर्गाची जरी कृपादृष्टी तशीच राहिली असली तरी कोरोनाची अवकृपा पडल्याने पर्यटकही घरातच बसून आहेत. तरीही काही हौशी पर्यटक जिवाची पर्वा न करता फिरताना दिसून येत आहेत. 

गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय. परंतु, राजवडी धबधबा कृत्रिम नाही तर तो नैसर्गिक बनलेला आहे. सतत पडणाऱ्या उंचीवरून पाण्यामुळे तो ढासळत चालला आहे. त्यामुळे धोकादायक बनलेला आहे. पर्यटकांनी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याची दरड पडत असल्याने जवळ जाणे धोक्‍याचे बनले आहे. त्यात कोरोना असल्यामुळे पर्यटकांनी निदान यावर्षी तरी आपल्या फिरण्याच्या मोहाला आवर घालणे गरजेचे आहे. 

कोट... 
""राजवडीतील धबधबा पाहायला मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने गावाचे नाव खूप प्रसिध्द झाले. मात्र, यावर्षी पर्यटकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडं थांबणं गरजेचे आहे. त्यात धबधबा ज्या प्रवाहातून वाहतोय तेथील दरड मोठ्या प्रमाणात कोसळलेली आहे तर काही निसटली आहे. त्यामुळे तिथे पर्यटकांनी जावू नये. दरड कोसळण्याची शक्‍यता असल्याने लांबूनच हा धबधबा पाहावा.'' 

-डॉ. मिलिंद कुंभार, सरपंच, राजवडी, ता. माण 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com