सातारा : सैनिकांना मिळणार पर्यावरणपूरक राखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सातारा : सैनिकांना मिळणार पर्यावरणपूरक राखी

सायगाव : दुदुस्करवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी बियांपासून पर्यावरणपूरक राखी तयार करण्याची कार्यशाळा जयहिंद फाउंडेशन व मुख्याध्यापक उमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेत विविध बियांच्या राख्या तयार केल्या.सैनिकांसाठी काम करणाऱ्या जयहिंद फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देशाच्या सीमेवरील सैनिकांना भाऊ व बहीण या प्रेमळ नात्याचा बंध असणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राख्या पाठवल्या जातात. निसर्गाचा समतोल राखावा, पर्यावरण टिकावे, त्यापासून होणारे फायदे युवा पिढीला कळावेत, यासाठी पर्यावरणपूरक राखी बनविण्यासाठी विविध प्रकारच्या बिया गोळा केल्या.

राखीचा वापर झाल्यानंतर त्या बियांचे रोपण करून पर्यावरण राखण्याचा संदेश दिला गेला. या राख्या बनविण्यासाठी वापरल्या गेलेल्या बियांचे अंकुरणे, रोपण, फुलणे, त्याला फळ येणे हे नाते बहरल्यासारखे आहे. म्हणूनच नात्यातला प्रेमाचा बंध निसर्गासोबत जोपासला जावा, यासाठी केलेल्या या उपक्रमास ग्रामस्थ व महिलांनीही प्रतिसाद दिला.पान ४ वर

जयहिंद फाउंडेशनने राबविलेले सर्व उपक्रम प्रेरणादायी असतात. अशा प्रकारे देशाच्या सैनिकांसाठी बनविलेल्या पर्यावरणपूरक राख्या प्रत्येक गावागावांत तयार होऊन त्याचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखता येईल. ‘जयहिंदच्या’वतीने सैनिकांसाठी राबविलेल्या उपक्रमात प्रत्येक नागरिकाने देशसेवा समजून सहभागी व्हावे.

- संदीप माने,अध्यक्ष, जयहिंद फाउंडेशन

Web Title: Satara Rakshabandhan Soldier Eco Friendly Rakhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..