City Bus Service : बससेवा सुरू होण्याच्या आशेने सुखावले सातारकर; जुन्या आठवणी जाग्या; मिनी बसची अपेक्षा

सातारा शहर बससेवा ही केवळ प्रवासाची सुविधा नसून साताऱ्याच्या दैनंदिन जीवनाचा एकेकाळचा अविभाज्य भाग होती.
satara city bus

satara city bus

sakal

Updated on

सातारा - शहर बससेवा ही केवळ प्रवासाची सुविधा नसून साताऱ्याच्या दैनंदिन जीवनाचा एकेकाळचा अविभाज्य भाग होती. राजवाडा, समर्थ मंदिर, मंगळवार तळे, संगमनगर, कृष्णानगर अशा शहराच्या विविध भागांना जोडणाऱ्या बससेवेच्या जुन्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेल्या पुढाकाराला नागरिकांनी दिलेली साथ आणि त्यानंतर शासनस्तरावर झालेल्या हालचालींमुळे आता सातारकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जुन्या बससेवेच्या आठवणींना उजाळा देतानाच नव्या पिढीसाठी पर्यावरणपूरक मिनी बससेवा लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांच्या प्रतिक्रियांमधून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com