ई-राष्ट्रीय परिषदेला प्रतिसाद; शोधनिबंध पाठवण्याचे आवाहन

अमाेल जाधव
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कऱ्हाड तालुक्‍यातील रेठरे बुद्रुक येथील कृष्णा महाविद्यालयात आंतरविद्या शाखीय ई-राष्ट्रीय परिषद झाली. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चर्चासत्राच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या संशोधन पत्रिकेसाठी शोधनिबंध पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : येथील कृष्णा महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एकदिवसीय आंतरविद्या शाखीय ई-राष्ट्रीय परिषद उत्साहात झाली. या चर्चासत्राच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या संशोधन पत्रिकेसाठी पाच ऑगस्टपर्यंत शोधनिबंध पाठवावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ. सी. बी. साळुंखे यांनी दिली. 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्त कृष्णा महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने "अण्णा भाऊ साठेंचे वाङ्‌मय पुनर्वाचनाच्या दिशा' या विषयावर एकदिवसीय आंतरविद्या शाखीय ई-राष्ट्रीय परिषद झाली. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने प्राप्त शोधनिबंध ISSN NO असलेल्या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात येणार आहेत. शोधनिबंधासाठी दीड हजार शब्दांची मर्यादा आहे. इच्छुकांनी 5 ऑगस्टपर्यंत kmrconference@gmail.com या मेलवर शोधनिबंध पाठवावेत. इच्छुकांनी संबंधित विभागातील डॉ. स्नेहल राजहंस, प्रा. माधवी पवार, प्रा. संजय पाटील, प्रा. बी. एस. माने यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्याकडून विषय घेऊन शोधनिबंध सादर करावेत, असे आवाहनही डॉ. साळुंखे यांनी केले आहे. 

या राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने प्राप्त शोधनिबंध ISSN NO असलेल्या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी शोधनिबंध पाठवावेत. 

- डॉ. सी. बी. साळुंखे, प्राचार्य, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक 

 

(संपादन ः संजय साळुंखे)

 

शासकीय कर्मचाऱ्यांनो खिसा रिकामा झालाय, मग ही आहे तुमच्यासाठी गुड न्यूज 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Response to e-National Conference; Appeal to send research papers