esakal | Satara: कऱ्हाडला पुन्हा फ्लेक्स वॉर; रस्त्याच्या दुरूस्तीसाठी गांधीगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाडला पुन्हा फ्लेक्स वॉर; रस्त्याच्या दुरूस्तीसाठी गांधीगिरी

कऱ्हाडला पुन्हा फ्लेक्स वॉर; रस्त्याच्या दुरूस्तीसाठी गांधीगिरी

sakal_logo
By
(शब्दाकंन - सचिन शिंदे)

क्य हुआ तेरा वाद.... ओ डांबर, ओ रस्ता

कऱ्हाडला पुन्हा फ्लेक्स वॉर : मार्केट यार्डातून बैलबजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी फ्लेक्सच्या माध्यमातून पुन्हा गांधीगिरी,

कऱ्हा़ड : ये पब्लिक है..... सब जानती है......, याद है मूझको तूने कहा था रस्ता करेंगे 15 दिनमे.., क्या हुआ तेरा वादा ओ डांबर व रस्ता अशा स्वरूपाचे फ्लेक्स मार्केट यार्ड परिसरातील रस्त्यावर आज पुन्हा महिन्यानंतर झळकले. त्याला कारणही तसेच होते. येथील मार्केट यार्ड परिसरातील गेट क्रमांत एक ते बैलबाजारकडे जाणार्‍या रस्ता महिन्यात दुरूस्त करण्याचे अश्वासन देवूनही तो न झाल्याने अनोळखी नागरीकांनी त्या रस्त्याचे वाभाडे पुन्हा एका नव्या शैलीत फ्लेक्सद्वारे मांडले. त्याची शहरात चर्चा होती.

अरे... मला कुणीतरी दुरूस्त करा रे....इलेक्शन टाईम आ गया मेरा नंबर कब आयेगा.... आयुष्य खूप सुंदर आहे, मतदान विचार करूनच कर...किती अपघातानंतर मला दुरूस्त करणार... असे एक नव्हे तर दहा वेगवेगळे फ्लेक्स शहाराच्या मार्केट यार्ड परिसरात पाच सप्टेंबराल झळकले होते.बैलबजार रस्त्याचे ते जणू मनोगत होते. नागरीकांची गांधीगिरी रस्ता दुरूस्तीसाठी होती. त्यामुळे वाढीव हद्दवाढ भागात त्याची जोरात चर्चा झाली. शहरातून ये-जा करण्यासाठीचा किमान किलोमीटरचा रस्ता खड्ड्यात आहे.

पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष त्याला कारणीभूत आहे. कावें नाका परिसरातील ५० हून अधिक उपनगरांतील नागरिकांना त्या रस्त्याच्या खड्ड्यांची यातना सहन करावी लागत होती. दुरुस्तीच्या नावाखाली होणाऱ्या मलमपट्टीतून काहीही साध्य झालेले नाही. त्याची सगली स्थिती फ्लेक्सव्दारे मांडली होती. त्यावेळी पालिकेतर्फे १५ दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याचे अश्वासन दिले होता. त्याला महिन्याचा कालवधी लोटला आहे.

मात्र अद्यपही तेथे रस्ता दुरूस्ती व काहीच कामे झालेली नाही. त्याची तब्बल महिन्याने पुन्हा प्रतिक्रीया उमटली आहे. महिनाभरापासून सुरू असलेल्या टोलवाटोलवीमुळे त्या भागातील रस्ता दुरूस्ती झालेली नाही. दूरावस्थेबद्दल परिसरातील संतप्त नागरिकांनी ठिकठिकाणी पुन्हा फलक लावून भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळी त्या फेल्कसची चर्चा शहरात सुरू होती. सोशल मिडियावरही त्याची धुम होती पालिकेची निवडणुक जवळ आल्याने त्या कृतीची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. बघता बघता त्या फ्लेक्सची छायाचित्रे व्हायरल झाली सबंधित रस्ता मंजूर झाल्याचे व त्याचे काम सुरू करण्याचे अश्वासन पालिकेतून दिले होते. मात्र महिन्याचा कलावधी उलटला तरी तरी अद्याप रस्ता न झाल्याने क्या हुआ तेरा वादा म्हणत आठवण करून देण्यात आली आहे.

loading image
go to top