Satara : मंत्री रामदास आठवलेंनी दाखवली अशीही तत्परता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athwale

Satara : मंत्री रामदास आठवलेंनी दाखवली अशीही तत्परता

रेठरे बुद्रुक : आरपीआयच्या ज्येष्ठ नेत्या बनूताई येलवे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. त्यांनी शोकसभेच्या व्यासपीठावर बनूताई येलवे यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले. व्यासपीठावरून खाली उतरताच त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन रोख आर्थिक मदत केली.

मंत्री आठवले यांनी बनूताई येलवे यांच्या निधनानंतर आज दुपारी शेरे येथे शोकसभा घेतली. त्या सभेत त्यांनी येलवे यांच्या आर्थिक व कौटुंबिक बिकट परिस्थितीबाबत विवेचन केले. येलवे यांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळावे, याचा ग्रामपंचायतीने प्रस्ताव द्यावा. त्यांना राहायला घर नव्हते; पण मनाने त्या पक्क्या होत्या. त्यांचे स्मारक उभारण्यासाठी माझ्या फंडातून निधी देईन. त्याचबरोबर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दोन लाखांची मदत देऊ, असे जाहीर केले. सभेतून खाली उतरून त्यांनी थेट त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी येलवे यांचा मुलगा सचिन व त्याची पत्नी प्रियांका यांच्याकडे तत्काळ २५ हजार रुपये सुपूर्द केले. एक केंद्रीय मंत्री, पक्षाचा राष्ट्रीय नेता एका सामान्य कार्यकर्त्यासाठी इतक्या तत्परतेने धावून येतो, याची प्रचिती तेथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष अनुभवली.

Web Title: Satara Rpi Leader Banutai Yelve Death Minister Ramdas Athawale Met His Family

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..