Satara : सलाईन लावलेल्या अवस्थेत ‘त्यांनी’ केली रुग्णसेवा

डॅाक्टर्स, परिचारिका अशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे
Dr. Chetan Ahiwale
Dr. Chetan Ahiwalesakal

खटाव : रुग्णसेवेचे व्रत हाती घेतलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कर्तव्यपूर्तीसाठीची धडपड सुरू ठेवल्याचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दिसून आले. रुग्णांची गर्दी व दुसरे वैद्यकीय अधिकारीही उपलब्ध नसल्याने आजारी असलेले येथील केंद्रप्रमुख डॅा. चेतन अहिवळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सलाईन लावून घेत रुग्ण तपासणी केली. डॉ. अहिवळे यांच्या हातून घडणाऱ्या या मानवसेवेचे मोल अमूल्य असल्याची नागरिकांनी भावना व्यक्त केली.

सद्य:स्थितीत खटाव व पंचक्रोशीतून विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. अशातच डॅाक्टर्स, परिचारिका अशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे उपस्थित डॅाक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. याचा प्रत्यय येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसून आला. येथील डॅा. अहिवळे कालपासूनच आजारी आहेत. आज रुग्णांची झालेली गर्दी व कर्मचाऱ्यांवर पडणाऱ्या ताणाचा विचार करून त्यांनी जोखीम पत्करून नर्सना स्वतःला सलाईन लावण्याच्या सूचना केल्या.

प्रत्येकाने जपावा सेवाभाव...

‘रुग्णसेवा हीच ईश्र्वरसेवा...’असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय डॉ. चेतन अहिवळे यांच्या कृतीतून येतो. अनेक जण सेवाभाव म्हणून या क्षेत्रात काम करतात. मात्र, काहींमध्ये मानवतेचा दृष्‍टिकोन दिसून येत नाही. स्वतः आजारी असतानाही डॉ. अहिवळे यांनी मानवसेवेला प्राधान्य दिले. त्यांचा सेवाभाव आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने आचरणात आणल्यास आरोग्य विभाग निश्‍चितपणे लौकिकास पात्र ठरेल.

आजारी आहे, म्हणून घरी असतो तर दिवसभर अंथरुणावर पडलो असतो. मात्र, अशा परिस्थितीतही ‍रुग्‍णांवर उपचार करून मिळणाऱ्या कामातून वेगळा आनंद मिळाला.

- डॉ. चेतन अहिवळे,वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खटाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com