
सातारा : साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती झाली आहे. आज दुपारीच तातडीने जाऊन श्री. डुडी यांनी पुणे येथे पदभार स्वीकारला. साताऱ्यात त्यांनी गेल्या १८ महिन्यांत केलेले काम लक्षवेधी ठरले आहे.