सातारा : दारूच्या ३६ हजार बाटल्या छाप्यात खोडदमध्ये जप्त

दोघांना अटक; ५३ लाखांचा ऐवज जप्त
liquor seized
liquor seized sakal

सातारा : गोव्यावरून राजस्थानला केली जाणारी दारूची चोरटी वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली. याप्रकरणी मध्य प्रदेशच्या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून टेंपो व दारूच्या ३६ हजार बाटल्या असा सुमारे ५३ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

मुकेश मोहनलाल सिसोदिया (वय ३९, रा. खजुरिया, ता. हातोड, जि. इंदोर, मध्य प्रदेश) व जितेंद्र भरतसिंग राठोड (वय ३६, रा. मेथवाडा, ता. डेपालपूर, जि. इंदोर मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोव्यावरून राजस्थानला गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वैभव वैद्य यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली विभागाच्या भरारी पथकाने महामार्गावर खोडद (ता. सातारा) हद्दीतील हॉटेल राजपुरोहितसमोर छापा टाकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com