Satara : ठेवी मिळण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच रोखलं

पोलसांनी वेळीच हस्तक्षेप करन आंदोलनकर्त्यांना रोखुन ताब्यात घेतले
आत्मदहन
आत्मदहनsakal

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी मिळाव्या यासाठी ठेवीदार शेतकऱ्यांनी इंद्रजीत मोहिते यांच्या येथील घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलसांनी वेळीच हस्तक्षेप करन आंदोलनकर्त्यांना रोखुन ताब्यात घेतले. ठेवी मिळण्यासाठी प्रशसनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रशासनाला केले आहे.

याबाबत माहिती पंजाबराव पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांनी महाराष्ट्राला सहकाराचे महत्व पटवून दिले. सहकारात पारदर्शकपणा आणून भ्रष्टाचार मुक्त सहकार भाऊंच्या काळात भावाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात बघायला मिळाला. मात्र त्यांच्याच नावावे असलेल्या पतसंस्थेतील ठेवी मिळु शकत नाहीत. ही पतसंस्था शेवटच्या घटका मोजत आहे. हजारो कष्टकरी शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी मुदत संपूनही परत मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या घरात लग्नासाठी,

मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, शेतीच्या कामासाठी पैशांची गरज असतानाही स्वतःच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर खाजगी सावकार आणि शेतीवर कर्ज काढून स्वतःचा उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. संस्थेचे कर्ज वाटप ठेवीच्या कितीतरी पटीने जास्त आहे. परंतु कर्जाची वसुली योग्य रीतीने केली जात नाही. कर्ज वसुलीसाठी यंत्रणा नाही त्यामुळे कर्ज वसूल होत नाही.

कर्जदार आणि ठेवीदार यांनी संगनमताने कर्जाची परतफेड ठेवीच्या रूपाने करण्याचे ठरवले तर संस्था त्यास मदत करत नाही. संस्थेची 80 टक्के कर्ज वाटप हे राजकीय दृष्ट्या कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. राजकीय हव्यासापोटी संस्थेने कर्जदाराकडून कर्ज परतफेडसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे संस्था अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आज आटकेतील बबनराव पाटील, कालेतील शंभूराज पाटील, कासार शिरंबेतील दीपक पावणे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com