आसूसह परिसरात ऊस, बाजरीची हानी, शेतकरी पूरता हवालदिल

Satara
Satara
Updated on: 

आसू (जि. सातारा) : गेली दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आसू परिसरातील आडसाली उसासह बाजरी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटातून शेतकरी सावरत असताना हातातोंडाला आलेली ही पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

फलटण तालुका तसा रब्बी हंगामाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, बदललेला निसर्ग, हवामान आणि कमीजास्त होत असलेल्या पावसामुळे तालुक्‍यात रब्बीबरोबरच खरिपात बाजरी, मका यांसारखी पिके घेतली जातात. याशिवाय उसाचे पारंपरिक पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मे आणि जूनमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे निर्माण झालेला उपलब्ध पाणीसाठा, तसेच नीरा उजवा कालव्यातून मिळालेले पाण्यामुळे खरिपातील बाजरी, मका यांसारख्या पिकांसह उसाचे पीकही जोमदार आले असताना गेल्या दोन दिवसांतील वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने 

आसू परिसरातील पवारवाडी, गोखळी, ढवळेवाडी, शिंदेनगर, मुंजवडी, हणमंतवाडी, खटकेवस्ती भागातील उसासह बाजरी, मका, भाजीपाल्याची हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जोमदार आलेली उभी पिके भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. 

तलाठी व कृषी सहायकांशी संपर्क साधा 

दरम्यान, तहसीलदार आर. सी. पाटील यांच्याशी आपली चर्चा झाली असून, तालुक्‍याच्या सर्व मंडलांतील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावचे तलाठी व कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन आसू येथील बळिराजा कृषी विज्ञान मंडळाच्या शिवाजीराव शेडगे यांनी केले आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Woman Jyoti Shelar Inspiring Education Journey DEd BA MA and Her Determination to Fulfill Fathers Dream
karad ganpati visarjan
Satara Shahupuri Police Bribe Case
Udayanraje Bhosale Supports Dolby Operators
Marathi News Esakal
www.esakal.com