
कोंडवे (जि. सातारा) : अननसात दारूगोळा घालून हत्तीला अमानुषपणे ठार करणारी माणसे एका बाजूला असताना जनावरांवर माणुसकी दाखवत त्याला जीवदान देणारी माणसे आणि त्यांची माणुसकी जिवंत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना शाहूपुरी (सातारा) येथे घडली आहे. माणूस माणसाबरोबर माणुसकी दाखवायला कमी पडतोय; परंतु येथे तर माणसांनी चक्क सापावर माणुसकी दाखवत त्याला जीवदान दिले आहे.
कोंडवे (ता. सातारा) येथील बापू सोनावणे व मृण्मयी जाधव हे सर्पमित्र आहेत. त्यांना शाहूपुरी येथील मतकर कॉलनीतून एका घरात मोठा साप असल्याचा मोबाईल कॉल आला. कॉल आल्यानंतर ते दोघेही तेथे गेले. तो साप धामण जातीचा असल्याचे त्याच्या लक्षात आले; परंतु त्याला एक मोठी जखम झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. ती जखम सापासाठी जीवघेणी सुद्धा ठरू शकत असल्याने त्यांनी लगेचच दुसरे सर्पमित्र स्वप्नील साळुंखे यांना लगेच मोबाईल करून बोलावून घेतले. त्यानंतर या तिघांनी मिळून डॉ. अभिराम पेंढारकर यांना साप जखमी झाला असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. त्यांनी ही विनंती आनंदाने स्वीकारून त्या "रॅट स्नेक'ची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले.
स्वप्नील साळुंखे व बापू सोनावणे यांनी त्या सापाला अगदी व्यवस्थित पकडून डॉक्टरांकडे नेल्यावर टाके टाकून त्याला जीवदान दिले. आता हा साप ठणठणीत झाला आहे. लवकरात लवकर त्याला जंगलात सोडण्यात येईल. धामण जातीच्या या सापाला जीवदान दिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. सापावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यावर सर्पमित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.