"या' तालुक्‍यात चक्क भर उन्हात भात लागण

patan
patan
Updated on

तारळे (जि. सातारा) : कोरोनाच्या संकटाला गेली चार महिने तोंड देता-देता मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना पावसाने रडविले आहे. 15 दिवस झाले पावसाने दडी मारल्याने भात लागणीवर परिणाम झाला आहे. चक्क उन्हात भात लागणी सुरू असून, पाण्यावरून वाद उत्पन्न होत आहेत. या दुहेरी संकटापुढे शेतकरी हतबल झाल्याचे विभागात चित्र आहे. 

तारळे विभागातील डोंगरदऱ्यात भाताचे मोठे क्षेत्र आहे. येथील बळीराजाची वर्षाची आर्थिक गणिते या पिकांवर अवलंबून असतात. अनेकविध जातीच्या भाताची लागण केली जाते. खासकरून इंद्रायणी वाणासाठी तारळे विभाग प्रसिद्ध आहे. सुवासिक व खायला रुचकर असल्याने जिल्ह्यातून असंख्य लोक खरेदीसाठी तारळे बाजरपेठेत गर्दी करतात. 300 रुपये पायलीप्रमाणे तांदूळ विकला जातो. 

तारळे विभागात दर वर्षी मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते. विभागातील मुरूड, तोंडोशी, मालोशी, घाटेवाडी, कळंबे, गायमुखवाडी, जुगाईवाडी, आंबेवाडी, भैरेवाडी, बोर्गेवाडी, चिंचेवाडी, वजरोशी, जळव, डफळवाडी, भोकरवाडी, बामणेवाडी, दुसाळे, बांधवाट, पाबळवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांचे भात हेच प्रमुख पीक आहे. सुमारे 3,500 हेक्‍टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. त्यापैकी सुमारे 1000 हेक्‍टर पेरणी व टोकन पद्धतीने, तर उर्वरित 2500 हेक्‍टर क्षेत्रावर लागण पद्धतीने भात लावला जातो. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे, तसेच मजुरांच्या तुटवड्यामुळेही अलीकडे भातशेती अडचणीत आली आहे. 

यंदाही त्याचाच अनुभव येत आहे. जूनच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावल्याने तरवे टाकले. तीन आठवडे ते महिन्याने लावणी योग्य होतात. बेंदूर सणापासून लावणीला सुरुवात करतात. ज्यांना पाणी उपलब्ध आहे, असे आधी लागण करतात. मात्र, बहुतांश क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. पावसाने ओढ दिल्याने तरवे वाळू लागली आहेत. नाइलाजाने शेतकरी लागणी करीत आहे. कोणी इंजिनाने पाणी काढून, तर कोणी आडव्या पाटाचे पाणी वळवून लागण करीत आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com