सातारा : तापोळा, बामणोली पर्यटकांनी हाउसफुल्ल!

बोटिंगसह वासोटा ट्रेकिंगला अधिक पसंती; दिवाळीनिमित्त सलग सुट्यांमुळे वाढला ओघ
तापोळा, बामणोली पर्यटकांनी हाउसफुल्ल
तापोळा, बामणोली पर्यटकांनी हाउसफुल्लsakal

कास : दिवाळीनिमित्त मिळालेल्या सलग पाच दिवसांच्या सुट्यांमुळे पर्यटकांनी मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळा, बामणोली, मुनावळे, शेबंडी मठ येथील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवसागर जलाशयातील बोटिंगसह वासोटा ट्रेकिंगचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत.

सलग मिळालेल्या सुट्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गोवा, काश्मीरच काय तर निळ्या आभाळाच्या छताखाली, चोहोबाजूंनी हिरव्यागार व घनदाट जंगलाने सजलेल्या डोंगररांगा आणि शिवसागर जलाशयाच्या अथांग जलाशयातील निळाशार पाण्याच्या लाटेवर बोटीतून प्रवास करणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. त्यातच सातारा, रत्नागिरी जिल्‍ह्‍याच्या हद्दीवरील उंच डोंगरावर घनदाट जंगलात असणारा शिवरायांचा वासोटा किल्ला, शिवशंकराचे नागेश्वर व पर्वत मंदिर, शिड्यांसाठी प्रसिद्ध चकदेव म्हणजे ट्रेकर्ससाठी वेगळी पर्वणीच असून या पर्यटस्थळांवर निसर्गासह येथील पारंपरिक नैसर्गिक वातावरण व अस्सल ग्रामीण जीवनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा वाढता ओघ दिसत आहेत.

जलाशयातील बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी बामणोली, तापोळा, मुनावळे व विनायकनगर मठ येथील बोटिंग क्लबवर गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन पर्यटन व्यवसाय सुरू झाल्याने, दिवाळीनिमित्त सलग सुट्या पडल्याने पर्यटकांचा कल तापोळा, बामणोलीकडे वाढल्याने येथील अडचणीत आलेला व्यावसायिक काहीसा सुखावल्याचे दिसून येत आहे.

बामणोलीतील भैरवनाथ बोट क्लबमध्ये सुसज्ज अशा ९२ बोटींचा ताफा पर्यटकांच्या सेवेसाठी कायम सज्ज असतो. सलग सुट्यांमुळे पर्यटकांचा ओघ वाढला असल्याने व्यवसायाला चालना मिळाली आहे.

- धनाजी सपकाळ, अध्यक्ष, बामणोली बोट क्लब

तापोळा येथील शिवसागर बोट क्लबमध्ये ३५० हून अधिक बोटी सज्ज असून पर्यटकांचा ओघ समाधानकारक आहे. महाबळेश्वर येथे आलेले बहुतांश पर्यटक तापोळा येथे येऊन बोटिंगचा आनंद लुटत आहेत.

- दीपक धनावडे, अध्यक्ष, तापोळा बोट क्‍लब

मुनावळे बोट क्‍लबची नव्याने स्थापना झाली असून अद्याप हे ठिकाण विकासापासून वंचित असले तरी पर्यटकांची येथील बारमाही वाहणाऱ्या मुनावळे धबधब्यासह जवळच्या वासोटा ट्रेकला अधिक पसंती आहे.

- किरण भोसले, सदस्य, मुनावळे बोट क्लब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com