esakal | Satara : जळालेली बस स्थानकातून हलवली
sakal

बोलून बातमी शोधा

satara

Satara : जळालेली बस स्थानकातून हलवली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोडोली : गेल्या तीन महिन्यांपासून बस स्थानकात जळालेल्या अवस्थेत खासगी बस उभी असल्याने वाहतुकीत अडथळा येत असल्याचे वृत्त दैनिक ‘सकाळ’ने छायाचित्रासह प्रसिद्ध करताच विभाग नियंत्रक सागर पळसुळे यांनी संबंधित जळालेली बस खासगी मालकास ताबडतोब नेण्यास सांगितले. त्याप्रमाणे संबंधिताने बसचा पंचनामा करून बस हलवली. त्यामुळे बस स्थानकातील ओंगळ स्वरूप बदलले. मात्र, अजूनही वापरात नसलेल्या २३ खासगी बस आवारात आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.

‘अरहम’ या खासगी वाहतूक कंपनीने एसटी महामंडळाशी करार केलेला आहे. त्यात वाहक व डिझेल महामंडळाचे असून, चालक खासगी कंपनीचा असतो. १६ रुपये किलोमीटर प्रमाणे पैसे महामंडळाकडून मोजावे लागतात. मात्र, दिवसभरात ३५० किलोमीटरचा प्रवास बसला करावा लागतो. सध्या सातारा आगारात २३ खासगी बस उभ्याच आहेत. सध्या कोरोनामुळे महामंडळाच्याच बसला अपुरे प्रवासी आहेत. त्यातच इंधन टंचाई, सेवकांचे पगार वेळेवर करणेही महामंडळाला जिकिरीचे झाले आहे.

संबंधित करार मुंबई कार्यालयाकडून झाल्याने सातारा आगाराला त्यात हस्तक्षेप करता येत नाही. बसचे चालक अल्प प्रशिक्षित असतात. महामंडळाच्या चालकांप्रमाणे ४५ दिवसांचे प्रशिक्षण झालेले नसते. प्रवाशांबद्दल आपुलकी नसते. तरीही २३ गाड्यांचा ताफा सातारा आगारात उभा आहे. त्याही गाड्या लवकर हलवून अडथळा दूर करणे गरजेचे आहे.

loading image
go to top