सातारा : 'ठोसेघरला वाघाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

वाघीण व बछड्याच्या अस्तित्वाच्या कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत.
tiger
tigertiger

सातारा : सातारा तालुक्यातील ठोसेघर व चाळकेवाडी परिसरात वाघीण व बछड्याच्या अस्तित्वाच्या कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत. समाजमाध्यमांवर फिरणारा याबाबतचा व्हिडीओ अन्य ठिकाणचा आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केले आहे.

ठोसघर परिसरात बछड्यासह वाघीण फिरत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत झाला होता. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती. या व्हिडीओची डॉ. चव्हाण यांनी दखल घेतली. त्यानंतर ते स्वत: तसेच वनपाल प्रशांत पडवळ, वनरक्षक राजकुमार मोसलगी, मारूती माने व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने काल रात्री दहा ते पहाटे तीनपर्यंत तसेच बुधवारी सकाळी ठोसेघर व चाळकेवाडी पठार परिसरात शोध मोहिम राबविली. त्यामध्ये वाघीणीच्या पाऊल खुणा, विष्ठा कोठेच आढळून आलेल्या नाहीत.

tiger
औरंगाबाद : शहरात वाढणार २० नगरसेवक

वाघीणीच्या अस्तित्वाच्या कोणताच पुरावा सापडला नाही. याबाबत तज्ञांशी चर्चा तसेच व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर ठोसेघर परिसरात वाघीण फिरत असल्याच्या अफवा असल्याचे समोर आले आहे. हाच व्हिडीओ शिरूर व संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसात फिरत असल्याचे समोर आले आहे. शिरूर वन विभागाने या संदर्भात दोन युवकांना शोधून समजही दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com