प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून हजारो शेतकरी वंचित, रहिमतपुरात प्रकार

Satara
Satara
Updated on

रहिमतपूर (जि. सातारा) : अत्यल्प, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 100 टक्के केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यात येत असून, या योजनेतून दोन हेक्‍टर किंवा त्यापेक्षा कमी भूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, अशी अट घालण्यात आली आहे; परंतु रहिमतपूर शहरातील दोन हेक्‍टरपेक्षा कमी भूधारक असणारे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. फॉर्म भरून सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले, तरी अजून त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा झालेला नाही. 

शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून देण्याकरिता कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र शासनातर्फे ही योजना सुरू आहे. देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून थोडाफार आधार मिळेल, अशी आशा असताना येथील शेतकऱ्यांची पूर्ण निराशा झालेली पाहायला मिळत आहे. पैसे का आले नाहीत, त्यात काही त्रुटी आहेत का याची माहितीही शेतकऱ्यांना मिळत नाही. यासाठी त्यांची ऑनलाइन फॉर्म भरणा केंद्रासह तलाठी कार्यालयाची पायपीट होत आहे. 

शासनाने ऑनलाइन पोर्टलवर पूर्ण माहिती जरी उपलब्ध केली असली, तरी "लिस्ट'मध्ये रहिमतपूरचे नाव नाही तर दुरुस्ती करणार कशी? या योजनेसाठी आधार कार्ड आणि सात-बारा एवढ्याच पुराव्यावर तलाठी कार्यालयाने सांगितलेल्या ऑनलाइन फॉर्म भरना केंद्रावरून शेतकऱ्यांनी फॉर्म भरून घेतले. फॉर्म भरताना संभाव्य फॉर्ममध्ये गावांच्या यादीत रहिमतपूर हे नावच नाही असे निदर्शनास येत असतानाही ऑनलाइन फॉर्म भरण्यात आले आणि त्यासाठी शेतकऱ्यांकडून 100 रुपयेही आकारण्यात आले; परंतु आज सहा महिने झाले शेतकरी आपल्या बॅंक खात्यात पैसे जमा झालेत का नाही हे पाहण्यासाठी बॅंकेत हेलपाटे मारत आहेत. वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 


गाव कामगार तलाठ्यांचे कानावर हात! 

दरम्यान, रहिमतपूरच्या तलाठ्यांकडून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. ऑनलाइनबाबत आम्हाला विचारू नका. नायब तहसीलदार यांच्याशी या विषयावर बोला, अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eknath Shinde Announces Crop Damage Panchanamas From October 5
Kas Plateau Flowers 2026
Clash Between Ruling and Opposition Factions at Sahyadri Sugar Factory AGM
Eknath Shinde Dare Village :  गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा
Marathi News Esakal
www.esakal.com