पाचगणीत पर्यटक वाढले तरी पॉइंट सील केल्याने घोडे व्यावसायिक अडचणीत

Satara
Satara
Updated on

भिलार (जि. सातारा) : पाचगणीतील घोडे व्यावसायिक कोरोनाच्या संकटाने अडचणीत आला असून, गेले सहा महिने व्यवसाय बंद असल्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर दुसरीकडे सरकारने ई- पास बंद केल्यामुळे पर्यटक वाढलेले असले, तरी पालिका प्रशासनाने पर्यटनस्थळे लॉकडाउन केल्याने या घोडे व्यवसायिकांनीची "आई जेवू घालना आणि बाप भीक मागू देईना' अशी परिस्थिती झाली आहे. 

पाचगणीत सध्या 200 घोडे असून, या व्यवसायावर सुमारे 500 कुटुंबे उदरनिर्वाह करीत आहेत. ऐन हंगामाच्या मार्च महिन्यातच कोरोनाचे संकट कोसळले व सर्व लॉकडाउन झाले आणि या फटक्‍यात घोडे व्यावसायिकांचीही प्रचंड होरपळ झाली. व्यवसाय नाही तो नाही पण लाखमोलाच्या घोड्यांच्या जीवाला सांभाळणे जिकिरीचे झाले. त्याला खाद्य, खुराक देणेही आवश्‍यक आहे. गेले सहा महिने झाले आम्ही या जिवांना पोसत आहोत. प्रसंगी बऱ्याच घोडेमालकांनी कर्ज काढून त्यांच्या खाद्याची व्यवस्था केली आहे, तर या घोडा व्यवसायाच्या जीवावर शेकडो कुटुंबे आपले पोट भरत आहेत. पर्यटन व्यवसायच ठप्प झाल्याने घोडे चालवणारे पगारी नोकरही सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. 

दरम्यान, नुकताच शासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली आहे आणि ई- पासही शासनाने रद्द केले आहेत. त्यामुळे पुन्हा व्यवसाय सुरू होतील या आशेवर व्यावसायिक होते; परंतु स्थानिक पालिका प्रशासनाने सर्व पर्यटनस्थळे लॉकडाउन केल्याने हे संकट आणखी गडद झाले आहे. बऱ्याच व्यावसायिकांनी घोडे कर्जावर खरेदी केले आहेत. त्यांना हप्ते देणेही होत नसल्याने अक्षरशः या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालून आम्हाला व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी व पालिकेनेही पर्यटनस्थळे खुली करावीत, अशी मागणी घोडे व्यावसायिकांतून होत आहे. 

""आम्ही कर्जावर घोडे खरेदी केले आहेत. सध्या व्यवसाय बंद असल्याने आमचे खूप नुकसान झालेले आहे. हप्ते नव्हे व्याजही देता येत नाही. आता पर्यटन सुरू होण्याच्या आशेवर आम्ही होतो; पण त्यातही पालिकेने पर्यटकांना नाकाबंदी केल्याने धंदे सुरूच होऊ शकत नाहीत. आम्ही आर्थिक कोंडीत सापडलो आहोत. शासनाने आम्हाला काही तरी मदत करावी.'' 

- राहुल बगाडे, व्यावसायिक 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com