...अन्‌ सर्कशीत हसवणारा विदूषक गहिवरला!

Satara
Satara
Updated on

लोणंद (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे शिरवळ परिसरात तीन महिन्यांपासून अडकून पडलेल्या सर्कस कलाकारांना येथील साथ प्रतिष्ठानने लोकसहभागातून काही जीवनावश्‍यक वस्तू जमा करून त्यांचे वाटप करून माणुसकी जपली आहे. या वेळी प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा विदूषक (जोकर) व अन्य कलाकार काहीसे गहिवरले. 

लॉकडाउनमुळे आसाम येथील ग्रेट रेमन सर्कस तीन महिन्यांपासून शिरवळ, पळशीनजीक गावडेवाडीच्या माळावर आडकून पडली आहे. हाताला काम नसल्याने या सर्कस कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना आजूबाजूच्या कंपन्यांत मिळेल ते काम करावे लागत आहे. याबाबत वृत्तपत्र व इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून साथ प्रतिष्ठानला माहिती मिळताच प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दीपक बाटे, शौकत शेख (पळशी), रोहित शेलार यांनी या सर्कस कलाकारांची भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली आणि या कलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले.

आवाहनला प्रतिसाद देत येथील मालोजीराजे विद्यालयातील 1986- 87 मधील दहावीची बॅच सर्व प्रथम मदतीसाठी पुढे सरसावली. बॅचमधील नगरसेवक हणमंतराव शेळके- पाटील, इतर काही दानशूर, साथ प्रतिष्ठानच्या सहकार्याने गहू, तांदूळ, तेल डबा, डाळी, कांदे आदी जीवनावश्‍यक साहित्य जमा करून या कलाकारांना भेट म्हणून दिले. उदरनिर्वाहासाठीची ही भेट पाहताच हृदयविकाराने त्रस्त असलेले ग्रेट रेमन सर्कसचे मालक प्रकाश माने व उपस्थित कलावंतांना काहीसे गहिवरून आले. 

शिरवळ व परिसरातील दानशूरांनीही सहकार्य केले आणि करत आहेत. मात्र, 75 कलावंत व विविध प्रकारच्या श्वानांना संभाळणे आणि त्यातून शिरवळ व परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद परिस्थितीत भीक मागणेसुद्धा मुश्‍कील होऊन बसले आहे. विदूषक, अन्य कलावंत व वेगवेगळ्या जातीच्या श्वानांसह जगणे जिकिरीचे झाल्याची खंतही कलाकारांनी साथ प्रतिष्ठनच्या पदाधिकाऱ्यांपुढे व्यक्त केली. 


""सर्कस कलावंतांना मदतीची अतोनात गरज आहे. त्यांचा उचित सन्मान व सहकार्य करण्याकामी विविध क्षेत्रातील संस्था व दानशूर मान्यवरांनी साथ प्रतिष्ठानशी संपर्क साधावा.'' 
- कय्युम मुल्ला, अध्यक्ष साथ प्रतिष्ठान 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahimangad Fort on the Path to Preservation; State-Protected Status Likely Soon
Karad Airport Modernization Faces Delays; Safety and Development Issues Under Scrutiny
Political Strategy in Full Swing Ahead of Council Polls; BJP Focuses on Securing Votes
Koyna Dam Water Levels Reach Critical Stage, Irrigation Withdrawals Stopped
Marathi News Esakal
www.esakal.com