
कऱ्हाड : कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिलासादायक चित्र सातारा जिल्ह्यात आहे. गेल्या तीन दिवसात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या शंभरच्या घरात आहे. त्या तुलनेत बाधितांची संख्या कमी आहे. मात्र मंगळवारी (ता.9) रात्री उशिरा आलेल्या अहवालात सातारा जिल्ह्यात नव्याने 20 बाधित रुग्ण सापडल्याने जिल्हावासियांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे सरासरी अधिक आहे. शनिवारी दिवसभरात 14 रुग्ण, सोमवारी 47 रुग्ण व मंगळवारी 37 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात दिलासादायक वातावरण आहे. असे असताना बाधित रुग्णही काही प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे चिंतेचे सावट कायम आहे. मंगळवारी (ता.9) दिवसभरात एकही नवीन बाधित न सापडल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेना, प्रशासनाने तसेच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र रात्री उशिरा आलेल्या अहवालात नव्याने 20 बाधित सापडल्याचे स्पष्ट झाले.
त्यात कऱ्हाड तालुक्यातील बाधितांची संख्या 12 आहे. यात तुळसण येथील पाच रुग्ण, केसे येथील सहा तर शिंदेवाडी (विंग) येथील एका बाधिताचा समावेश आहे. कऱ्हाड तालुक्यात नव्याने बारा रुग्ण सापडल्याने कऱ्हाड तालुक्यातील बाधितांच्या संख्या दाेनशे पार केला आहे. कऱ्हाड तालुक्यातील रुग्णांची संख्या 209 झाली आहे. आज (बुधवार) अखेर कऱ्हाड तालुक्यातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 169 झाली आहे.
राष्ट्रवादीत कही खुशी, कही गम...
उदयनराजे... सातारकरांच्या विश्वासाला तडा जातोय!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.