सातारा : बैलगाडी विहिरीत पडून दोन बैलांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बैलगाडी

सातारा : बैलगाडी विहिरीत पडून दोन बैलांचा मृत्यू

वडूज : पाचवड (ता. खटाव) येथील यात्रेनिमित्त आयोजिलेल्या बैलगाडीने शर्यतीत आखलेली फाटी (ट्रॅक) पूर्ण केल्यानंतर बैलगाडी चालक खाली पडल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने बैलगाडी विहिरीत पडून दोन बैलांचा मृत्यू झाला.

याबाबत नायब तहसीलदार रविराज जाधव यांनी सांगितले, की पाचवड (ता. खटाव) येथील जोतिबा यात्रेनिमित्त प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊन बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन केले होते. त्यानुसार आज बैलगाड्या शर्यत सुरू होत्या. सुमारे चार वाजताना

एक बैलगाडीने (गाव माहीत नाही) शर्यतीचा ट्रॅक पूर्ण केल्यानंतर बैलगाडी पुढे गेली. त्यात चालक खाली पडून त्याचा बैलांवरील ताबा सुटला. त्यानंतर बैलगाडी सैरावैरा धावत विखळे हद्दीतील औतडवाडीतील विहिरीत पडल्याने दोन्ही

बैलांचा मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित मालकाने

बैलांना वर काढीत बैलगाडी ताब्यात घेतली.

घटनास्थळी नायब तहसीलदार रविराज जाधव दाखल झाले. या घटनेनंतर बैलगाड्यांची शर्यती रद्द करण्यात आली.