सातारा जिल्ह्यात कन्नडवाडी,जिहेतील बाधितांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

सातारा जिल्ह्यातील घेतलेले एकुण नमुने 15253 इतके आहेत. त्यापैकी एकूण बाधित    1372 इतके असून घरी सोडण्यात आलेले  813 रुग्ण तसेच मृत्यु झालेले 57 आणि सध्या उपचारार्थ रुग्ण 502 आहेत.
 

सातारा  : सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 2, प्रवास करुन आलेले 3, सारीचे 5 व आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण  11 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले आला आहे. तसचे माण तालुक्यातील कन्नडवाडी व सातारा तालुक्यातील जिहे येथील बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,  अशी  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 
यामध्ये सातारा तालुक्यातील  फडतरवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, धनगरवाडी, कोडोली येथील 48 वर्षीय पुरुष, करंडी येथील 59 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 42 वर्षीय पुरुष आरोग्य कर्मचारी जावळी तालुक्यतील कुसुंबी येथील 35 वर्षीय पुरुष,कोरेगाव येथील सुभाषनगर येथील 75 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60 वर्षीय पुरुष, पारगाव येथील 50 वर्षीय पुरुष, फलटण येथील 34 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

भोगावच्या सहायक पोलिस निरीक्षकास साताऱ्यात पडली लाखाेंची भुरळ अन्...

दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा कन्नडवाडी ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष व जिहे ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष या दोन कारोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

  • घेतलेले एकुण नमुने 15253
  • एकूण बाधित    1372
  • घरी सोडण्यात आलेले    813
  • मृत्यु    57
  • उपचारार्थ रुग्ण    502
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Two Covid 19 Patient Expired In Satara District