Video : पोवई नाक्‍यापर्यंत सर्व काही अतिक्रमण समजावे का? उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

गणेशोत्सवासाठी दरवर्षी 50 लाख खर्च करावे लागणार आहेत. पालिकेच्या गार्डनची जागा कायमस्वरूपी विसर्जनासाठी द्यावी, ती आम्ही डेव्हलप करू. महापालिका असती तर जागेचा प्रश्‍न निर्माण झाला नसता, असे खासदार उदयनराजे भाेसले यांनी स्पष्ट केले.

सातारा : साताऱ्यात रेल्वेचा मोठा प्रोजेक्‍ट आणण्याचा मानस असून, संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. रेल्वेच्या बोगी बनविण्याचा प्रकल्प असणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शासकीय जागेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा आम्ही केंद्राकडे दिला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. कऱ्हाड-चिपळूण लोहमार्गासह व सातारा-पुणे डबल ट्रॅकचे काम भूसंपादनात रखडले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी येत्या आठ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजप खासदार उदयनराजे उवाच; केंद्र व राज्य सरकारला दिला 'हा' सल्ला
 
खासदार भोसले यांनी आज सातारा पालिकेशी संबंधित काही प्रश्‍न, औद्योगिक वसाहत, रेल्वे आणि कोरोनाच्या प्रश्‍नासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी त्यांच्यासमवेत सुनील काटकर, ऍड. दत्तात्रय बनकर, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

साताऱ्यातील विविध प्रश्‍नांचे मुद्दे मुख्यमंत्र्यांपुढेही मांडणार आहे. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना कऱ्हाड-चिपळूण लोहमार्ग आणि सातारा-पुणे डबल ट्रॅकच्या कामाची आम्ही मागणी केली होती. पण, हे काम भूसंपादनात अडकल्याने रखडले आहे. यासंदर्भात येत्या आठ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे. त्यामध्ये सर्व मार्ग निघेल.'' 
जिल्ह्यात रेल्वेचा मोठा प्रोजेक्‍ट आणण्याचा माझा मानस असल्याचे सांगून उदयनराजे म्हणाले,"" संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. साताऱ्यात रेल्वेच्या बोगी बनविण्याचा प्रकल्प होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शासनाच्या उपलब्ध जागेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा आम्ही केंद्राकडे सादर केला आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय होईल.''
 
गणेशोत्सवासाठी दरवर्षी 50 लाख खर्च करावे लागणार आहेत. पालिकेच्या गार्डनची जागा कायमस्वरूपी विसर्जनासाठी द्यावी, ती आम्ही डेव्हलप करू. महापालिका असती तर जागेचा प्रश्‍न निर्माण झाला नसता, असे सांगून ते म्हणाले,"" सातारा कारागृह परिसरात पाचशे मीटर जागेत बांधकामावर परवानगी मिळत नाही. त्यामुळे पोवई नाक्‍यापर्यंत सर्व काही अतिक्रमण समजावे लागेल. त्यामुळे कारागृहाच्या परिसरातील काही अंतर सोडून बांधकामाला परवानगी द्यायला हवी.'' 

मंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती द्या... 

उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपूर्वी साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. तुम्ही त्यांना का भेटला नाही, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले,""याची मला कोणी कल्पना दिली नव्हती. लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कळवायला हवे होते. माझ्या ऑफिसला त्यांच्या दौऱ्याचे पत्र यायला हवे होते. त्यांना वाटते आम्हालाच दौरे पडतात. त्यामुळे आम्हाला कोणी दौरे कळवत नाही. मुळात अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला पाहिजे.'' 

चीनमधील आयात बंदीनंतर कोरेगावचा राजमा देशात खाणार भाव

तीन चिमुकले..अन् एका वृद्धास ठार मारणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद..! 

पुरापासून असे करा घरांचे संरक्षण, रेठऱ्यातील आरिफ मुजावर यांचे संशोधन

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Udayanraje Bhosale Addressed To Media In Satara City