सातारा : झोपडपट्टीबाबतचे ‘त्यांचे’ प्रेम ढोंगीपणा

शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता लबाड लांडग्याची उपमा
Udayanraje Bhosale vs Shivendrasinharaje Bhosale
Udayanraje Bhosale vs Shivendrasinharaje Bhosaleesakal

सातारा : झोपडपट्टीतील हातावर पोटे असणाऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्यांच्या आणि तोंडी कायापालटाची भाषा करणाऱ्यांचे हे प्रेम खरे प्रेम नसून हा ढोंगीपणा व मगरीचे अश्रू आहेत. त्यांचे हे नवीन ढोंग माजगावकर माळावरीलच काय साताऱ्यातील सर्वच झोपडपट्टी भागातील नागरिकांनी ओळखले आहे. त्यामुळे मराठी चित्रपटातील गाण्याप्रमाणे लबाड लांडगं ढवांग करतंय... आता स्वांग करतंय... इतकच त्याला महत्त्व आहे, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळून केली आहे.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उदयनराजेंनी म्हटले, की सातारा शहरातील माजगावकर माळ, लक्ष्मी टेकडी, भीमाबाई आंबेडकरनगर, ४४० सदरबझार, रामाचा गोट, राजलक्ष्मी पिछाडी अशा सर्व ठिकाणी हातावरची पोटं असणारी आणि कष्टकरी जनता राहते. आज ज्यांनी काही ढोंग केले आहे. त्यांचेच सर्वेसर्वा असणारे तत्कालीन सत्ताधीशांनी माजगावकर माळावरील झोपड्या उठवून येथील लोकांना हाकलवून लावण्याचा ठराव पालिकेत पारित केला होता. बुलडोझर आणि मशिनरी आणून येथील लोकांना देशोधडीला लावण्याचे पूर्ण नियोजन केले होते.

केवळ आम्ही ठामपणे आडवे पडल्यानेच येथील झोपड्या शाबूत राहिल्या. त्याकाळात पोलिस लाइनच्या पाठीमागील पंताचा गोट काही भागातील झोपड्यांची वस्ती पोलिस बंदोबस्तात आणि बळाचा वापर करून पालिकेमार्फत हटविली होती. येथील लोकांना काही क्षणांत बेघर केले गेले. त्यावेळी यांचेच सर्वेसर्वा तत्कालीन नगरपालिकेत सर्व शक्तिमान सत्ताधीश होते.

झोपडपट्टीसदृश वसाहतीत सर्वसामान्य माणसेच राहतात. त्यांच्याविषयी माणुसकीची भूमिका घेऊन माजगावकर माळासह भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, २७८ रामाचा गोट आदी ठिकाणी आम्ही सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना घरकुल योजनेंतर्गत किमान मूलभूत सुविधांसह हक्काचे घर उपलब्ध करून दिले. कोणतीही झोपडी हटविण्यास आम्ही कारणीभूत ठरलो नाही, तसेच जेथे त्यांनी ढोंग केले.

त्या माजगावकर माळ येथे पीएमआय योजनेअंतर्गत शाहूपुरी पोलिस ठाणे ते आकाशवाणी झोपडपट्टीअखेर रस्ता डांबरीकरणाकरिता सुमारे ७५ लाख आणि आकाशवाणी ते महानुभव पंथाचा मठ अखेर रस्त्यासाठी सुमारे रुपये ७५ लाखांच्या डांबरीकरणासाठी पालिकेच्या जनरल कौन्सिल ठराव क्रमांक ४२ ता. ०३/०९/२०२१ चे ठरावान्वये मंजुरी देण्यात आली आहे. या कामांमध्ये करंजे इंडस्ट्रीयल इस्टेटच्या अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचाही समावेश आहे. ठराव मंजुरीनंतरचे प्रशासकीय सोपस्कारही होतील. पावसाळ्यानंतर या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी कायापालट कशाला म्हणतात हे आधी समजून घेणे गरजेचे आहे.

त्यांच्या या तथाकथित ढोंगी कार्याकडे एक कुतूहल म्हणून बघण्यापलीकडे त्याला फारशी किंमत वाटत नाही. यांची श्रेयाचे साँग आणि इतर ढोंग मागे पाहिली आहेत. यापुढेही पाहायला मिळतील. त्यामुळे मराठी चित्रपटातील गाण्याप्रमाणे लबाड लांडगं ढवांग करतंय.. आता स्वांग करतंय, इतकंच त्याला महत्त्व आहे. माजगावकर माळसह सर्व झोपडपट्टीधारक तर संबंधितांचे पुतना मावशीचे प्रेम निश्चितच ओळखतील, असेही उदयनराजे यांनी नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com