कोयना खोऱ्यात मुंबई, पुणेकरांना मिळेना रोजगार

Satara
Satara
Updated on: 

कोयनानगर (जि. सातारा) : लॉकडाउनच्या काळात मुंबई, पुणे, ठाण्यासह अन्य भागांत रोजगारासाठी गेलेल्या सगळ्यांची घरवापसी सुरू आहे. परतणाऱ्या भूमिपुत्रांमध्ये कोयना विभागाची संख्या तालुक्‍यात सर्वाधिक आहे. या सगळ्या घरवापसी झालेल्यांना भागात रोजगार उपलब्ध नाहीत. कोयना विभागात नवीन उद्योग येण्याची तूर्त तरी कोणतीही शक्‍यता नाही. त्यामुळे घरवापसी केलेल्या तालुक्‍यातील जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 

कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात पुणे, मुंबईहून कोयना विभागातील आठ हजार 975 नागरिकांची घर वापसी झाली आहे. त्यामुळे गावे "हाउसफुल्ल' झाली आहेत. मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यांतून आलेल्यांची रोजगार नसल्याने होरपळ होत आहे. तालुक्‍यातील बहुतांशी लोक रोजगाराला मुंबई, पुण्यासह अन्यत्र जातात. त्यामध्ये कोयना विभाग सर्वात पुढे आहे. कोयनाचे नाव धरणामुळे कानाकोपऱ्यात गेलेले आहे. मात्र, कोयनापुत्रांसाठी येथे काहीही करता आलेले नाही. कोयना पुनर्वसितांसाठी पूर्वी येथे हात कागद सहकारी कारखाना होता. तो काळाच्या पडद्याआड गेलेला आहे.

कोयना प्रकल्पात निर्माण होणाऱ्या विजेची चपळता घेऊन तालुक्‍यामधील जनतेने छोटे उद्योग सुरू केले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी औद्योगिक क्षेत्रासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मंत्री देसाई यांच्याकडे कौशल्य विकास खात्याची जबाबदारी आहे. राज्याच्या विकासाची घडी बांधताना पाटण तालुक्‍यातील रोजगार निर्मितीला प्रयत्न झाले पाहिजेत, तरच बाहेर रोजगाराच्या शोधात जाणारे लोक थांबू शकतात. तालुक्‍यातच रोजगारासाठी उपलब्ध होऊ शकतात. कोरोनामुळे परतलेले चाकरमानी येथेच रोजगार असता, तर परजिल्ह्यात गेलेच नसते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action
Sugar Mill Opening
Marathi News Esakal
www.esakal.com