शेतातून 18 हजार रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे चोरीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

कोणीतरी अज्ञाताने ता. आठ  मे रोजी फोडून कॅमेऱ्याच्या सप्लाय असणाऱ्या वायरी तोडून नुकसान केले होते.

रहिमतपूर (जि.सातारा) : सासुर्वे (ता. कोरेगाव) येथील कैलासगड आमराई नावाच्या शिवारातील 18 हजार रुपये किमतीचे कॅमेरे व स्विच अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबतची फिर्याद शिवाजी मोरे यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सासुर्वे (ता. कोरेगाव) येथील आमराई हॉटेल शेजारी कैलासगड नावाचे शिवारात अडीच एकर आंब्याची बाग आहे. त्यात शिवाजी मोरे यांनी शेती क्षेत्रासाठी पाण्याकरिता पाच हजार लिटरच्या दोन टाक्‍या बसविल्या आहेत. त्या कोणीतरी अज्ञाताने ता. आठ  मे रोजी फोडून कॅमेऱ्याच्या सप्लाय असणाऱ्या वायरी तोडून नुकसान केले होते.

त्याबाबतच तक्रार अर्ज दिला होता. ता. 29 मे रोजी शेतात पाहणी केली असता दुसऱ्या कॅमेराला गेलेल्या सप्लायच्या सुद्धा वायरी तोडल्या होत्या. असे एकूण एचके व्हिजन कंपनीचे तीन कॅमेरे व दाेन पोर्ट स्विच असा 18 हजार रुपये किमतीचा कॅमेरे व स्वीच कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

शाब्बास...पोलिसांनीच काढला शोषखड्डा!, मित्रासाठी श्रमदान

सुखद धक्का : कऱ्हाडच्या नागरिकांनी घेतला मोकळा श्‍वास

वारीबाबत ही आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका

कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारास सातारा जिल्ह्यात या गावांचा विरोध

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Unidentified Persons Stolen CCTV Camera From Farm