गाढवांचा वापर करत वाळूचोरी, लॉकडाउनचा फायदा घेत "या' गावात पाणवठ्याजवळ प्रकार

Satara
Satara

सातारा (जि. सातारा) : लॉकडाउनचा फायदा घेत काशीळ (ता. सातारा) येथील उरमोडी नदीकडेला असलेल्या गावच्या पाणवठ्याजवळ गाढवांचा वापर करत खुलेआम वाळूउपसा केला जात आहे. या चोरीच्या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडतो आहे. या घटनेची माहिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली असल्याचे बोलले जात असून, या कारवाईचे संकेत दिले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमुळे ग्रामस्थ घरीच थांबत आहेत. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी वाळू चोरी करण्यावर सपाटा लावलेला आहे. या वाळू चोरी व वाहतुकीसाठी चक्क गाढवांचा वापर केला जात आहे. या चोरीमुळे शासनाच्या महसुलास चुना लागत आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या वाळू चोरीमागे नेमका सूत्रधार कोण, हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर महसूल विभागाने वाळू चोरट्यांवर ठोस कारवाई करत चाप लावण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. या चोरीतून नेमका किती ब्रास वाळूचा साठा केला? आणि संबंधितांवर तशी कारवाई केली जाणार का? आदी प्रश्‍न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पावसाने दडी मारल्याने उरमोडी नदीची पाणीपातळी खालावल्याचे पाहून ही वाळूचोरी केली जात असताना महसूल विभागाच्या वतीने ठोस उपाययोजना राबविण्याची खरी गरज असल्याची अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com