सातारा : मोरणा धरणातून आज पाणी सोडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Morna dam

सातारा : मोरणा धरणातून आज पाणी सोडणार

मोरगिरी : पाटण तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, मोरणा गुरेघर धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. उद्या (रविवारी) सकाळी पाच वाजता मोरणा विद्युतगृहातून १५० क्युसेक पाणी मोरणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. पावसाचा जोर वाढत राहिल्यास सांडव्याद्वारे पाण्याच्या विसर्गात कोणत्याही क्षणी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे मोरणा नदीकाठावरील गावातील लोकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये, असे मोरणा गुरेघर धरणाचे सहायक उपअभियंता सागर खरात आणि शाखा अभियंता निखिल खांडेकर यांनी सांगितले.

पावसाने दमदार हजेरी लावली असून, मोरणा गुरेघर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणाच्या देखभाल दुरुस्तीचे काम करणे आवश्यक असल्याने महिन्यांपूर्वी धरणांमधील पाणीसाठा खाली करण्यात येऊन धरण पूर्णपणे रिकामे करण्यात आले होते. नंतरच्या काळात पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

मोरणा गुरेघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. सध्या गुरेघर धरणातील पाण्याची पातळी ६५१.६५० मीटर असून, धरणामध्ये ३८.९५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोरणा गुरेघर पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सक्रिय झाल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.

पावसाचा जोर वाढल्यास सांडव्याद्वारे पाण्याच्या विसर्गात कोणत्याही क्षणी वाढ करण्यात येऊ शकते. वीज तयार करण्यासाठी लागणारे पाणी उपलब्ध नसल्याने व असलेल्या पाणीसाठ्यातील पाण्याचे उपयोग वीज निर्मितीसाठी होत नसल्याने धरण क्षेत्रातील वीजनिर्मिती प्रकल्प बंद होता. धरणाचे पाणी विद्युतगृहातून मोरणा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.

Web Title: Satara Water Released From Morna Dam Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top