
सातारा : पालिकेच्या पाणी योजना अत्याधुनिक बनविण्यात येत असून, त्यासाठीची यंत्रणा उभारणीचे काम सध्या गतिमान आहे. या कामादरम्यान स्मार्ट मीटरची जोडणी नळजोडांना करण्यात येत असून, या वेळी विनापरवाना नळजोड घेतलेल्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. असे विनापरवाना नळजोड घेणारे नागरिक पालिकेच्या भूमिकेमुळे धास्तावले असले तरी त्यांना त्यासाठी मदत करणारे या कारवाईतून अलगद सुटत असल्याचे समोर येत आहे. पाणी चोरीसाठी नागरिकांना मदत करणाऱ्या तसेच पालिकेच्या रस्त्याची खोदाई करत वाहिनीवरून नळजोड देणाऱ्यांवरही पालिकेने योग्य ती कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.