esakal | आम्ही तयार; तुम्ही फक्त लढ म्हणा!
sakal

बोलून बातमी शोधा

man

कोरोनाविरुद्धचे युद्ध अजून संपलेले नाही. या युध्दाशी दोन हात करण्यासाठी पाठीवर थाप देऊन तुम्ही फक्त लढ म्हणा, आम्ही सदैव तयार आहोतच, असा पुनःनिर्धार गोंदवल्यातील कोरोना योद्‌ध्यांनी केला. 

आम्ही तयार; तुम्ही फक्त लढ म्हणा!

sakal_logo
By
फिराेज तांबाेळी

गोंदवले (जि. सातारा) : कोरोनाविरुद्धचे युद्ध अजून संपलेले नाही. या युध्दाशी दोन हात करण्यासाठी पाठीवर थाप देऊन तुम्ही फक्त लढ म्हणा, आम्ही सदैव तयार आहोतच, असा पुनःनिर्धार आज गोंदवल्यातील कोरोना योद्‌ध्यांनी केला. ग्रामपंचायतीकडून कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित झाल्याने कष्टाचे फळ मिळाल्याचे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर उमटले. 

कोरोनाच्या आपत्ती काळात गोंदवले बुद्रुकमधील (ता. माण) नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलिस विभाग व ग्रामपंचायतीच्या खांद्याला खांदा लावून आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, स्वच्छता कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीने काम केले. काही कोरोनाबाधित आढळल्याने जिवाचे रान करत संसर्ग रोखण्यात यश मिळाले. या कामाचे कौतुक व्हावे व कामासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र देऊन कोरोनायोद्धा म्हणून या सर्वांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच अश्विनी कट्टे, उपसरपंच संजय माने, ग्रामपंचायत सदस्या विद्या कट्टे, राजेंद्र कट्टे, हाफीजा तांबोळी, शोभा सोनवणे, पोलिस पाटील आशा भोसले, डॉ. समीना तांबोळी, डॉ. समीर तांबोळी, तलाठी प्रमोद इनामदार, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार आदी उपस्थित होते. 

कोरोनाविरुद्धचे युद्ध अद्याप संपलेले नाही. त्यामुळे आगामी काळातही कोरोना हद्दपार ठेवण्यासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याची भावना योद्‌ध्यांनी व्यक्त केली. उपसरपंच संजय माने म्हणाले, ""ग्रामस्थांसह येथे येणाऱ्या लोकांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचे काम कोरोना योद्‌ध्यांनी केले आहे. सर्वांनी तळमळीने काम केल्याने या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कोरोना योद्‌ध्यांमुळेच गाव सुरक्षित आहे. त्यामुळे या आपत्ती काळात गाव रोलमॉडेल ठरले आहे.'' प्रमोद इनामदार, डॉ. समीर तांबोळी, आशा भोसले यांची भाषणे झाली. ग्रामविकास अधिकारी अमोल पवार यांनी सूत्रसंचालन केले. 

दै. "सकाळ'चेही कौतुक 
कोरोनाच्या आपत्ती काळात दै. "सकाळ'ने गोंदवल्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकल्याने आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी चालना मिळाली असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात दै. "सकाळ'चे बातमीदार फिरोज तांबोळी यांनाही सन्मानित करण्यात आले. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

आता कडुनिंब पळविणार कोरोनाला? कसे ते वाचा 

loading image
go to top