माण तालुक्यात जे पिकतं ते सोनचं!

man
man

दहिवडी (जि. सातारा) : माणमधील शेतकऱ्यांची एकी व प्रयोगशीलता अनुकरणीय असून त्यामुळे गावे समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत. भौतिक सुखांच्या मागे न धावता आनंदासाठी काम करा, माणसं जपा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांनी केले. 

माण तालुक्‍यातील विविध गावांमधील प्रगत व उपक्रमशील शेतकऱ्यांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आबा लाड, भालचंद्र पोळ, अजित पवार, संजय साबळे, रावसाहेब देशमुख आदी उपस्थित होते. माणमध्ये जलयुक्त शिवार, पाणी फाउंडेशन, मनरेगाच्या माध्यमातून जलसंधारण, वृक्षारोपण तसेच शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात चांगली कामे झाली आहेत. या कामांची मान्यवरांनी पाहणी केली. सुरुपखानवाडी येथील आंबा व सीताफळ बाग, बिदालमध्ये ग्रामस्थांनी वन विभाग व खासगी जागेत केलेल्या व उत्तमरित्या जोपासलेल्या वृक्षारोपणाची पाहणी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी अविनाश पोळ यांनी ग्रामस्थांशी पाण्याचे नियोजन व पीक पध्दतीबद्दल चर्चा केली. परकंदी येथे सरपंच बाळासाहेब कदम यांनी पाणी फाउंडेशनमध्ये केलेल्या कामामुळे झालेला फायदा सांगितला. 

जाधववाडी व येळेवाडी येथे मनरेगांतर्गत फळबाग लागवडीची पाहणी करण्यात आली. बिहार पॅटर्नच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले. शेतकऱ्यांनी बाजाराचा अभ्यास करून शेती तसेच पशुपालन केले पाहिजे, असे आवाहन मामूशेठ वीरकर यांनी केले. वडगाव येथे सुजित अवघडे यांचे जैविक शेतीचे प्रयोग पाहून सर्वजण चकित झाले. त्यानंतर बालाजी ऍग्री फार्मला भेट देण्यात आली. मार्डी येथे ज्ञानेश काळेंचे शेळीपालन केंद्र तसेच प्रभाकर पोळ यांच्या डाळिंब, शेवगा, ऍपल बोर यांच्या बागांची पाहणी केली. त्यानंतर किरकसाल गावाला भेट देण्यात आली. 

या संपूर्ण दौऱ्यादरम्यान डॉ. पोळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाण्याचे नियोजन करणे, सेंद्रिय व जैविक शेतीवर भर देणे, वृक्षारोपण करणे व जोपासणे, लखपती किसान तयार करणे यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. भालचंद्र पोळ यांनी विषमुक्त शेती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com