"ह्यांचा' बंदोबस्त करणार तरी कधी?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

पाटण तालुक्‍यात जंगल क्षेत्र भरपूर आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे प्रमाणची मोठे आहे. त्यातच डोंगराच्या बाजूच्या शेतीतील पिकांची वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नासधून केली जाते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सातत्याने तक्रारी करुनही काहीही उपयोग होत नाही. वानरांच्या उपद्रवामुळे कुंभारगाव परिसरातील शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे हे शेतकरी हतबलतेतून ह्या वानरांचा बंदोबस्त करणार करणार तरी कोण, असे विचारत आहेत. 

तळमावले (जि. सातारा) : कुंभारगाव (ता. पाटण) गेल्या काही दिवसांपासून कुंभारगाव परिसरात वानरांनी धुमाकूळ घातला आहे. ही वानरे पिकांचे व अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वानरांची तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

समृद्ध वनसंपदा लाभलेल्या पाटण तालुक्‍यात आता वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागला आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून परिसरात रानडुकरे, रानगवे, माकडे व वानरांनी रानात, शेतीत धुमाकूळ घालत लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. पूर्वी साधारणपणे माकड, वानर या जाती सर्रास जंगलात आढळतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात वानरांनी धुमाकूळ घातला आहे. 

ही वानरे कुंभारगाव, मान्याचीवाडी, बोरगेवाडी, चाळकेवाडी, जांभूळवाडी, चिखलेवाडी, मोरेवाडी, शेंडेवाडी आणि गलमेवाडी या परिसरातील शेतीमधील खास करून भुईमूग पिकाचे नुकसान करीत आहेत. मात्र, या वानरांची तक्रार वन विभागाकडे करायची, की ग्रामपंचायतीकडे? ही समस्या निर्माण झाली आहे. वानरांचा उपद्रव रोखण्यासाठी वन खात्याने काही तरी उपाययोजना करण्याची गरज आहे. वन खात्याने एक तर वानर पकडण्याची मोहीम राबवावी किंवा वानरांना जंगलात परतवण्यासाठी उपाय योजावेत, अशी मागणी विभागातील शेतकऱ्यांकडून होत आहे. 

 

चीनमधील आयात बंदीनंतर कोरेगावचा राजमा देशात खाणार भाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Will you ever take care of them?