
सातारा : सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन काम शोधणाऱ्या महिलेस लिंकच्या माध्यमातून त्यासाठीचे आमिष दाखवत २१ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनोळखी इन्स्टाग्राम अकाउंटधारकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची तक्रार मंजुळा राहुल घाडगे (रा. दौलतनगर, करंजे) यांनी नोंदवली आहे.