सातारा : युवकाचा दगडाने ठेचून खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्यामध्ये जिल्ह्यातील दारू दुकाने बंद होती. त्याचबरोबर नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी होती. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. चौथ्या लॉकउाऊनमध्ये थोडी शिथीलता देण्यात आली. त्यामध्ये दारूची दुकानेही सुरू झाली. त्यानंतर काही ठिकाणी दारूच्या पार्टीमध्ये वादावादी होऊन खून होण्याच्या घटना घडल्या आहेत.

सातारा : तालुक्‍यातील देगाव - निगडी रस्त्यावर रविवारी रात्री एका युवकाचा डोक्‍यात भला मोठा दगड घालून खून करण्यात आला आहे. आज (साेमवार) सकाळपयर्यंत मृताची ओळख पटलेली नव्हती. 

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये पार्टी करण्यासाठी बसलेल्या युवकांमध्ये वादवादी होऊन खूनाचे प्रकार घडले आहेत. वाढे फाटा परिसरातही सायकल लपविल्याच्या कारणावरून एका युवकाचा खून करण्यात आला होता. तो गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. आज सकाळी तालुका पोलिसांसमोर नव्हे आव्हान समोर आले. आजही तालुक्‍यात एका युवकाचा खून झाला. 

देगाव-निगडी रस्त्यावरील एका शेतामध्ये एका युवकाचा डोक्‍यात दगड घालून खून केल्याची माहिती परिसरात वेगाने पसरीली. त्यामुळे तो कोण युवक आहे हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने देगावकडे रवाना झाले. देगाव - निगडी रस्त्यावर एका शेतामध्ये त्यांना युवकाच्या डोक्‍यात दगड घालून खून केला असल्याचे निदर्शनास आले. परिसरात चौकशी करूनही मृत युवकाची ओळख पटलेली नव्हती. 

संबंधीत युवकाच्या अंगावर निळ्या रंगाची अंडर पॅन्ट व पांढऱ्या रेशा असलेला निळा शर्ट होता. त्याच्या खिशामध्ये त्याच्या ओळखीचा कोणताही पुरावा पोलिसांना आढळून आला नाही. पोलिस निरीक्षक सजन हंकार यांच्या निर्देशानुसार पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. परिसरामध्ये काही दारूच्या बाटल्याही आढळून आल्या आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदानुसार काही मित्र एकत्रीत दारू प्यायला बसले असतील. दारू पिल्यानंतर भांडण झाल्यानंतर खून झाला असू शकतो. खुनाचा तपास करण्यासाठी एक स्वतंत्र तपास पथक तयार करण्यात आले आहे.

गंभीर..! सातारा जिल्ह्यातील कोरोना वाॅर्ड फुल्ल 

...तरीही सातारी कंदी पेढ्याची चवच न्यारी 

सातारा मिलिटरी कॅन्टीनबाबत महत्वाची बातमी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Youth died In Satara Taluka Crime News