पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव, जि. सातारा) - मुरबाड (जि. ठाणे) येथील सिध्दगडावर रविवारी (ता. १५) नवी मुंबईतील येथून गिर्यारोहणासाठी आलेल्या १४ पर्यटकांपैकी एका २१ वर्षीय तरुणाचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. तर अडकलेल्या इतर १३ पर्यटकांना सुखरूप बाहेर आणण्यात पोलीस व रेस्क्यू टीमला यश आले आहे.