Satara Youth drowned in Marathwadi reservoir, accident due to lack of predictionsakal
सातारा
Satara: मराठवाडीच्या जलाशयात युवक बुडाला, अंदाज न आल्याने दुर्घटना
Maharashtra News: मराठवाडी धरणाच्या जलाशयाचा हा भाग असून, पूर्वी त्याठिकाणी केलेल्या खोदकामामुळे पाण्यात खोल खड्डे आहेत.
Marathawada News: मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उमरकांचन (ता. पाटण) गावाजवळ घडली. ओंकार रमेश भिंगारदेवे (वय १७) असे मृत युवकाचे नाव आहे. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ओंकार भिंगारदेवे काही मुलांसमवेत काल दुपारी गावाजवळच्या वांग नदीपात्रात पोहायला गेला होता. त्यांच्यापैकी कुणालाही पोहता येत नव्हते. मराठवाडी धरणाच्या जलाशयाचा हा भाग असून, पूर्वी त्याठिकाणी केलेल्या खोदकामामुळे पाण्यात खोल खड्डे आहेत.

