esakal | लढा कोरोनाशी : लाखाे लाेकांसाठी सातारा जिल्हा परिषदेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

लढा कोरोनाशी : लाखाे लाेकांसाठी सातारा जिल्हा परिषदेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून ग्रामीण भागातील लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

लढा कोरोनाशी : लाखाे लाेकांसाठी सातारा जिल्हा परिषदेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील पाच लाख ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या आज झालेल्या बैठकीत कोरोना संसर्गाचा प्रभाव ग्रामीण भागांतही वाढत असल्यामुळे उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी ग्रामीण भागात आरोग्य समितीच्या निधीतून पाच लाख मोफत आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या विरोधात लढाई लढताना ग्रामीण भागातील ग्रामस्थांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी पुढाकार घेतला. बैठकीस उषादेवी गावडे, शारदा ननावरे, डॉ. अभय तावरे, डॉ. भारती पोळ, भाग्यश्री मोहिते, राजेश पवार, राजाराम शेलार, शंकर जगदाळे, समितीचे सचिव डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. याबाबत उपाध्यक्ष विधाते यांनी सांगितले, की जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून ग्रामीण भागातील लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 


जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील पाच लाख ग्रामस्थांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप मोफत करणार आहे.
प्रदीप विधाते, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 

 

रेशनिंग दुकानदारांचा ठाकरे सरकारला दणका; धान्य वाटप बेमुदत बंद

केजरीवाल यांना मागे टाकत उद्धव ठाकरे यांनी मारली बाजी, वाचा काय केलंय उद्धव ठाकरेंनी...

loading image
go to top