Satara ZP Election: सातारा झेडपी निवडणुकीत इच्छुकांची चढाओढ; ३९ जागांसाठी महायुतीत ‘फिल्डिंग’, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्ष मैदानात!

Political leaders Receiving Applications from Aspirants in Satara ZP polls: जिल्हा नियोजन समितीच्या ३९ जागांसाठी महायुतीसह सर्व पक्षांतून इच्छुकांची लगबग; झेडपी, नगरपालिकांतील नेत्यांची तिकिटासाठी नेत्यांकडे धावपळ
Satara Politics in Action: Multi-Party Contest Intensifies for 39 Zilla Parishad Seats

Satara Politics in Action: Multi-Party Contest Intensifies for 39 Zilla Parishad Seats

sakal

Updated on

-उमेश बांबरे

सातारा: जिल्हा परिषदेच्या निवडणुका असोत किंवा विषय समित्यांचे सभापतिपद, ज्या स्थानिक नेत्यांची संधी थोडक्यात हुकली किंवा ज्यांना निवडणुकीत यशाने हुलकावणी दिली, अशा नेत्यांचे डोळे आता जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीकडे लागले आहेत. जिल्ह्याच्या विकासाचे ‘बजेट’ ठरवणाऱ्या या महत्त्वाच्या समितीवर जाण्यासाठी राजकीय वर्तुळात आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून, ३९ जागांसाठी इच्छुकांनी नेत्यांकडे शब्द घेण्यास सुरुवात केली आहे. यातील ३२ जागा झेडपी सदस्यांतून आणि सात जागा नगरपालिकांतून निवडल्या जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com