साताऱ्याच्या हॉकीपटूंचा डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hockey Tournament

साताऱ्याच्या हॉकीपटूंचा डंका

फलटण शहर - हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून बालेवाडी (पुणे) येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र सब ज्युनिअर हॉकी मुले व मुली संघाच्या निवड चाचणीमध्ये दि हॉकी सातारा संघटनेच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामध्ये येथील मुधोजी हायस्कूलच्या चार जणांचा समावेश आहे, तर एक खेळाडू साताऱ्याच्या के. एस. डी. शानभाग विद्यालयातील आहे. दीक्षा शिंदे, निकिता देशमुख, किरण मिंड, पियुष गायकवाड, प्रतीक चोरमले अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत.

ही सब ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धा मणिपूर- इंफाळ आणि पुरुष हॉकी स्पर्धा गोवा येथे आयोजित करण्यात आली आहे. त्या स्पर्धांमध्ये हे पाच खेळाडू सहभागी होणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये निकिता देशमुख ही के. एस. डी. शानभाग विद्यालयाची खेळाडू असून, उर्वरित चारही खेळाडू मुधोजी हायस्कूलचे आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाअंतर्गत सुरू असणाऱ्या जिल्हा हॉकी प्रशिक्षण केंद्रामध्ये हे सर्व खेळाडू जिल्ह्याचे मुख्य हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे, सचिन धुमाळ व सागर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. या सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक- निंबाळकर, महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा आदींनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Sataras Five Player Selected In State Sub Junior Hocky Team

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top