कोरोना विषाणू संकटातही वाढतोय खासगी सावकारांचा पाश!

Satara
Satara
Updated on

तारळे (जि. सातारा) : डोंगरदऱ्यांत कोरोनाची भीतीमुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. कोरोनाच्या काळात उद्योगधंदे बंद आहेत. नोकऱ्यांवर टाच आली आहे, अशा स्थितीत डोंगरदऱ्यांतील ग्रामस्थ हैराण असताना त्यांच्या मनात आणखी एका अनामिक भीतीने काहूर माजले आहे. डोंगरदऱ्यांतील घरांच्या दारात सावकाराचा पाश वाढतो आहे. खासगी सावकारांकडून होणाऱ्या त्रासाची कोरोनाच्या काळातच भर पडली आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यांतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अडल्या नाडलेल्यांना मदत करत असल्याचा आव आणून खासगी सावकर पैसा वाटत आहेत. त्याची वसुली करताना झिजिया करासारखी वसुली करायची, असाच सपाटा लावला आहे. बेहिशोबी व्याज, न संपणारे मुद्दल आणि व्याजाच्या चक्रात दऱ्याडोंगरातील सामान्य गरीब शेतकरी, आतकरी 
व रोजंदारी करणारे अडकले आहेत. त्यांचे खासगी सावकारांकडून होणारे हाल बघवत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यांच्याकडून पिळवणूक होत आहे. कोरोना संकटात सावकारीच्या वसुलीने डोके वर काढले आहे. त्यांना रोखण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे. त्यावर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनीही लक्ष देण्याची गरज आहे. खासगी सावकारांनी विभागात पाय घट्ट रोवले आहेत. शेतकऱ्यांसह लहान व्यावसायिक त्यांच्या पाशात अडकले आहेत. अडलेल्यांना त्यांची निकड लक्षात घेऊन 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत मासिक व्याजाने पैसे वाटले जातात. सामान्य नागरिक त्यात असा अडकत जातो, की त्यातून ते बाहेर पडतच नाही. 

मुद्दल तशीच राहून व्याज फेडण्यात कैक दिवस निघून जातात. दिवस चुकला तरी चक्रवाढ व्याजाने पैशाची आकारणी करणारेही सावकार भागात आहेत. मध्यंतरी अशाच एका घटनेची तक्रार पोलिसात दाखल झाली. वर्षात व्याजापोटी 45 हजारांची रक्कम वसूल केली गेली. त्या संबंधिताला दिलेली मुद्दल 50 हजार होती. तर व्याजाची वसुली 45 हजारांची झालेली होती. त्याची मुद्दल तशीच राहिली होती. अशा आकारणीला कंटाळून पोलिसांतही तक्रार केली गेली आहे. पोलिसही त्यावर अपेक्षित कारवाई करत नाहीत. खासगी सावकारांचे त्यांचे हितसंबंध असतात. त्यामुळे फिर्याद दाखल झाली तरी कारवाईत कुचराई होताना दिसते आहे. 

पोलिसांच्या कारवाईला मर्यादा 

काहीजण तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. सावकारांच्या धमकी, दमदाटीला ते घाबरतात. काहींनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. मात्र, त्यामागचे कारण काहाही असले तरी मूळ खासगी सावकारीच असते. मात्र, तेथेही कारण वेगळचे दाखवून फाईल बंद केली जाते. काही वेळा तक्रार होत नसल्याने पोलिसांच्या कारवाईला मर्यादा येत आहेत. 

संपादन :  पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sowing Season Worry: ‘Certified’ Seeds Allegedly Fail Quality Test
Shovels in Hand, Change in Action: Women’s Collective Effort Wins Praise
Koyna Dam submerged villages history
Farmers Rejoice as Persistent Rain Boosts Water Levels in Koyna Catchment
Marathi News Esakal
www.esakal.com