
कऱ्हाड : शेतकऱ्यांची अनेकदा बियाणे खरेदीतून फसवणूक होते. बियाणे उगवून न आल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात. त्यामुळे त्यांची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस प्रतिबंध घालण्यात येऊन बियाणे विक्रीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून देण्यात येणारे सत्यप्रत बियाणे आता साथी पोर्टलवर नोंदणी करूनच दिले जाणार आहे.