
कोरेगाव : तब्बल ३० वर्षांपूर्वी शिक्षण अर्धवट सोडून प्रथम लग्न, घर संसार त्यानंतर अंगणवाडी सेविका अन् आजीही बनलेल्या एकंबे (ता. कोरेगाव) येथील सावित्रीच्या लेकीने जिद्द व कष्टाच्या जोरावर इयत्ता दहावीची परीक्षा देऊन चांगल्या गुणांसह घवघवीत यश संपादन केले आहे. नीलम ज्ञानदेव चव्हाण असे या लेकीचे नाव आहे.