मद्यधुंद पोलिसांकडून सावंत कुटुंबीयांना मारहाण

वडाचे म्हसवेत प्रकार; एसपींकडे तक्रार करणार, अपुरी माहिती दिल्याचे पोलिसांचे म्हणणे
Sawant family beaten by drunken police
Sawant family beaten by drunken policesakal
Updated on

कुडाळ : वडाचे म्हसवे (ता. जावळी) येथील योगेश सावंत व कुटुंबातील सदस्यांना काल (ता. ६) रात्री मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा आरोप सावंत कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित आरोपांबाबतचा व्हीडीओही समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.

यासंदर्भात दबंगगिरी करणाऱ्या पोलिसांविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देणार असल्याचेही योगेश सावंत यांनी सांगितले. झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांशी संपर्क केला असता संबंधित घटना ही गावातील अंतर्गत रस्त्याच्या वादातून व तक्रारीवरून झाली असून, घडलेल्या घटनेची अपुऱ्या माहितीद्वारे माहिती दिली गेली असल्याचे सांगत या सर्व प्रकाराबद्दल आणखी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मेढा पोलिसांकडून नकार देण्यात आला. योगेश सावंत यांनी दिलेल्या निवेदनानुसार वडाचे म्हसवे येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील असणाऱ्या एका पाणंद रस्त्यावरून पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवर करहरचे पोलिस श्री. शिंदे, पोलिस हवालदार व चालक श्री. कांबळे हे रात्री दहाच्या सुमारास सावंत कुटुंबीयांच्या घरी आले. त्यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. तुम्हाला पोलिस ठाण्यात यावे लागेल, असे म्हणत योगेश यांच्या कॉलरला धरत फरफटत गाडीमध्ये बसवले व कुडाळ येथे आल्यानंतर काही वेळाने गाडीतून ढकलून बाहेर हाकलले आणि तिथून निघून गेले. दरम्यानच्या काळात योगेश यांची पत्नी शीतल व त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीलाही मारहाण करण्यात आली. घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे न्याय मागणार असल्याचेही सावंत कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. सर्जेराव विष्णू सावंत, शीतल योगेश सावंत, रामदास विष्णू सावंत, शंकर नाना सावंत, शालन मारुती सावंत, सूरज रामदास सावंत, प्रतिभा शिवाजी शिर्के, किरण शिवाजी सावंत, संदीप अशोक सावंत यांनी याबाबतच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com