
सातारा : माझी सगळी जडणघडण ही साताऱ्याच्या मातीतून झाली. माझ्या गुरूंनी माझ्यावर योग्य संस्कार केले. माझ्या आईने, इथल्या नाट्य क्षेत्राने मला घडवले. त्यामुळेच आजवरचा प्रवास यशस्वी ठरला, या शब्दांत ख्यातनाम अभिनेते सयाजी शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केले.