
जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या वर्गांचे एकूण नऊ हजार 160 शिक्षक आहेत. त्यातील चार हजार 700 शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. सर्व शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व इतर खासगी ठिकाणी शिक्षक कोरोना चाचणी करत आहेत.
सातारा : तीने रात्रीच आईला सांगितले होते. " ये आई, मला लवकर उठव. शाळेला लवकर जायचे आहे.' मार्चनंतर शाळेच दुसरे वर्ष सुरु होऊन अर्धे झाले तरी शाळेत जाता आले नाही. सर्वच शाळकरी मुलांना सात - आठ महिने शाळे पासून, अपल्या मित्र मैत्रीणींपासून दुर रहावे लागले होते. शासनाने आजपासून (बुधवार, ता. 27) शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि कोरोनामुळे घ्याव्या लागलेल्या सक्तीच्या सुट्टीला कंटाळलेल्या मुलांनी आज दप्तर पाठीवर टाकत मित्रांच्या खांद्यावर हात टाकत स्कूल चले हमचा नारा दिला.
कोरोनाच्या संकटामुळे मार्चपासून बंद असलेले पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांचे वर्ग आज (बुधवार,ता. 27) सुरू झाले. सातारा शहरातील बहुतांश शाळांचा परिसर आज बच्चे कंपनीच्या किलबिलाटाने गजबजून गेला. शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसली तरीही आज शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयच हाेती असे म्हणावे लागेल. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना शाळेत येणे अशक्य आहे, त्यांना ऑनलाइन वर्गांच्या माध्यमातून शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती काेळेकर यांनी दिली.
शाळा सुरु होणार हे कळताच गेले दोन दोवस मुलांची नुसतीच धांदल उडाली होती. माझं दप्तर कुठाय, डबा कुठाव अशी घरातल्यांना विचारत शोधा शोध सुरु होती अन रात्रीच झोपताना आई - बाबांना मला लवकर उठवा बरं का असे सांगून झाेपी गेलेली मुलं आज सकाळ पासून " आई आटप लवकर. झाला का नाही माझा डबा' असे म्हणतच वेणी फणी आवरून युनिफॉर्म घालून तयार झाली होती. शाळेची पहिली घंटा होण्यापुर्वीच मुले शाळेच्या गेटवर हजर होती.
कोरोना काही प्रमाणात नियंत्रित आल्यानंतर 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर बहुतांश जिल्ह्यांतील शाळा सुरक्षिततेचे उपाय राबवित सुरळीत सुरू असल्याने आता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांची दारे उघडली आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानूसार उपयायाेजना करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असल्याने सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात आले असले तरी त्यास नग्णय प्रतिसाद मिळाल्याचे समजते. जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या वर्गांचे एकूण नऊ हजार 160 शिक्षक आहेत. त्यातील चार हजार 700 शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. सर्व शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व इतर खासगी ठिकाणी शिक्षक कोरोना चाचणी करत आहेत.
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा अपमान महाराष्ट्र अजून किती सहन करणार?
उदयनराजेंनी साेडविलेला प्रश्न पुन्हा उदभवला; व्यावसायिकांचा पालिकेस सात दिवसांचा अल्टीमेटम