

मसूर : हणबरवाडी येथील निगडी (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीतील इनाम नावाच्या शिवारातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. प्रसाद बापू कोळेकर (वय १३, रा. हणबरवाडी) असे त्याचे नाव असून, तो इयत्ता सातवीत शिकत होता.