पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी युवकांचा पुढाकार

पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी युवकांचा पुढाकार
Updated on

गोंदवले (जि. सातारा) : छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अनेक मोहिमा फत्ते करणाऱ्या जिवा महाले यांच्या जयंतीनिमित्त नरवण्यातील नाभिक युवकांनी वृक्षलागवडीची मोहीम फत्ते करण्याचा विडा उचलला आहे. परिसरातील डोंगरभागात बियारोपण करून याची सुरुवात करण्यात आली. 

प्रतापगड परिक्रमात छत्रपतींचे अंगरक्षक जिवा महाले यांची महाराजांना कमालीची साथ मिळाली होती. या शूर वीर जिवा महाले यांची जयंती नरवणे (ता. माण) येथील नाभिक कार्यकर्त्यांनी साजरी केली. माण तालका स्वाभिमानी नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय काशीद व शाखाध्यक्ष हिंदुराव काशीद यांनी पुढाकार घेऊन यानिमित्त परिसरात बियांचे रोपण करण्याचा निर्णय घेतला. 

गावातील सर्वच युवक त्यासाठी एकवटले. सध्या होत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन करण्याची गरज लक्षात घेऊन परिसरात वनराजी फुलविण्याचा निर्णय घेण्यात आला. परिसरातील डोंगरभागात कार्यकर्त्यांनी हजारो बियांचे रोपण केले. यावेळी सचिन काशीद, बाळासाहेब काशीद, पोपट काशीद, सुखदेव सूर्यवंशी, संदीप काशीद, प्रणव सूर्यवंशी, प्राजक्ता काशीद आदी युवक या मोहिमेत सहभागी झाले होते. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आम्ही जिवा महाले जयंतीचे औचित्य साधून बियारोपण केले असून, वृक्षसंगोपन व संरक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या दत्तात्रय काशीद यांनी सांगितले.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com